मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाने जुलै २०२४ मध्ये महिलांसाठी सुरू केलेली एक योजना आहे. महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली होती.
लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत ९ हप्त्याचे पैसे महिलांना मिळाले आहेत. महिला अधिकृत वेबसाईटवर जाऊन लाभार्थी यादी पाहू शकतात.
या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना ₹ १,५००/- असा आर्थिक लाभ देण्यात येतो. आता लाडक्या बहिणींना महाराष्ट्र सरकार वाढीव हप्ता देणार आहे, १,५०० रूपया ऐवजी आता लवकरच २,१०० रुपये प्रति महिना लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे.
लाडकी बहीण योजना २,१०० रुपये चा लाभ महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२५ नंतर मिळणार आहे. एप्रिल महिन्या पासून प्रती महिना २,१०० रुपये आर्थिक लाभ लाभार्थी महिलांना दिला जाणार आहे.